खासदार श्रीरंग बारणे यांनी केले पवनामाईचे जलपूजन
पिंपरी, ता. ३ ऑगस्ट २०२६ - पवना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानिमित्त रविवारी (ता. २) खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते दरवर्षीप्रमाणे यंदाही पवना धरणावर जाऊन पवना माईचे विधिवत जलपूजन करण्यात आले.
पवना धरण हे पिंपरी-चिंचवडच्या लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. त्यामुळे जलपूजन हा केवळ एक धार्मिक विधी नसून, जलसंपदेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि तिच्या संवर्धनाचा संकल्प अधिक दृढ करण्याचा क्षण आहे, अशी भावना खासदार बारणे यांनी व्यक्त केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाऊ खांडभोर, शिवसेना तालुकाप्रमुख राम सावंत, उपतालुकाप्रमुख अमित कुंभार, युवासेना उपजिल्हाप्रमुख दत्ताभाऊ केदारी, युवासेना मावळ लोकसभा प्रमुख विशाल हुलावळे, देहूरोड शहरप्रमुख दिपक चौगुले, पंचायत समिती सदस्या शैलाताई रामचंद्र कालेकर, पवना धरण शाखा अभियंता रजनीश भारिया, मोहन कालेकर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.