'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांचे दिल्लीत आगमन, दिल्ली पोलिसांची आंदोलनाला परवानगी

'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांचे दिल्लीत आगमन, दिल्ली पोलिसांची आंदोलनाला परवानगी

 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांचे दिल्लीत आगमन, दिल्ली पोलिसांची आंदोलनाला परवानगी

पुणे, ता. ६ - कॉकरोच जनता पार्टी या ऑललाईन चळवळीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचे शनिवारी (ता. ६) भारतात दिल्लीमध्ये आगमन झाले आहे. शनिवारी कॉकरोच जनता पार्टीचे जंतर-मंतर मैदानावर देशातील युवा वर्गाची बेरोजगारी व शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहारांच्या निषेधार्थ आंदोलन शांतातापूर्ण करणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा,  परीक्षा पेपरफुटी प्रकरणांची न्यायालयीन चौकशी व्हावी, युवकांसाठी रोजगार उपलब्ध आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी या कॉकरोच जनता पार्टीच्या मुख्य मागण्या आहेत. 


अभिजीत दीपके  सकाळी ८ वाजता विमानतळावर दाखल झाले. दिल्ली पोलिसांनी 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) ला जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. अभिजीत दिपके यांनी सांगितले की, "शिक्षा व्यवस्थेतील गोंधळ, NEET, CUET, CBSE पेपर लीक आणि युवकांच्या बेरोजगारीविरुद्ध आम्ही शांततापूर्ण आवाज उठवणार आहोत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या परवानगीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत."

दिल्ली पोलिसांनी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत आंदोलनाला परवानगी दिली असून, शांतता राखण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही हिंसाचाराला परवानगी नसेल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.  जंतर मंतर मैदानावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories