शहरातील मुस्लिम धार्मिक स्थळांवरील कारवाईच्या विरोधात १२ जूनला महापालिकेवर धरणे आंदोलन

शहरातील मुस्लिम धार्मिक स्थळांवरील कारवाईच्या विरोधात १२ जूनला महापालिकेवर धरणे आंदोलन

शहरातील मुस्लिम धार्मिक स्थळांवरील कारवाईच्या विरोधात १२ जूनला महापालिकेवर धरणे आंदोलन

पिंपरी, ता. ६ - पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम धार्मिक स्थळांवर प्रशासनाकडून होत असलेल्या कारवायांच्या निषेधार्थ शहरातील मुस्लीम समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. या अन्यायाविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवण्यासाठी येत्या शुक्रवारी (ता. १२) दुपारी ठीक २:०० वाजता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवनासमोर भव्य 'धरणे आंदोलन' करण्यात येणार आहे. 

धार्मिक स्थळांवरील महापालिकेच्या कारवाईला विरोध करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी  शहरातील प्रमुख मुस्लिम पदाधिकाऱ्यांची आणि विविध संघटनांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार नुकतीच पिंपरीमध्ये पार पडली. या बैठकीत प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. महानगरपालिका भवनासमोर भव्य 'धरणे आंदोलन' करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

शहरातील धार्मिक स्थळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी या आंदोलनाचे नियोजन करण्यात आले असून, यामध्ये पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories