देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या २५ वर्षीय युवकाला दिघी परिसरातून अटक
पिंपरी, ता. १६ - विनापरपवाना एका जिवंत काडतूसासह देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या २५ वर्षीय युवकाला दिघी परिसरात मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने रविवारी (ता. १४) अटक केली आहे. याबाबत, सोमवारी (ता. १५) युवकाविरोधात दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे पोलिस शिपाई गणेश सावंत यांनी याबाबत फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर संभाजी जाधव (वय २५ वर्षे, रा. ता. उद्गीर, जि. लातूर) याने विनापरवाना ५१,०००/- रुपयांचे १ लोखंडी देशी बनावटीचे पिस्तूल व १ जिवंत काडतूस (राऊंड) जवळ बाळगले होते. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात अवैध शस्त्रे बाळगणेबाबतच्या मनाई आदेशाचे त्याने उल्लंघन केले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
आरोपीविरोधात दिघी पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम ३, २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.