फिनोलेक्स कंपनीच्या केबल्सचा अपहार; टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा

फिनोलेक्स कंपनीच्या केबल्सचा अपहार; टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा

फिनोलेक्स कंपनीच्या केबल्सचा अपहार; टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा

पिंपरी, ता. १६ - वाहतुकीसाठी सोपविण्यात आलेल्या फिनोलेक्स कंपनीच्या केबल्सचा अपहार केल्याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विजय अशोकराव कु-हे (वय ३८, रा. फुगेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश विजय चव्हाण (वय ३२, रा. शुभम पार्क, वराळे, ता. खेड, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश चव्हाण हा धनंजय रोड वेज प्रा. लि. ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये आयशर टेम्पो चालक म्हणून कार्यरत होता. कंपनीने ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथून मुंबईतील लोहार चाळ परिसरात माल पोहोचविण्यासाठी आयशर टेम्पो (एमएच-१४ केक्यू-३४७४) मधून फिनोलेक्स कंपनीचे केबल बॉक्स पाठविले होते.

मात्र, ५ ते ७ मे २०२६ या कालावधीत सुमारे १० लाख ५४ हजार ९२९ रुपये किमतीचा माल नियोजित ठिकाणी न पोहोचविता त्याचा अपहार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories