राजमाता जिजाऊ आणि महाराणा प्रताप यांना शहर काँग्रेसकडून अभिवादन
पिंपरी, ता. १७ - राजमाता जिजाऊंना स्मृतिदिनानिमित्त आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड काँग्रेसकडून अभिवादन करण्यात आले. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी राजमाता जिजाऊ यांच्या भोसरी लांडेवाडी येथील स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पुणे जिल्हा घिसाडी (लोहार) समाज संस्थेच्या पुणे बिबवेवाडी येथील जयंतीच्या उपक्रमात सहभागी होऊन शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आज महाराणा प्रताप यांना अभिवादन केले, या प्रसंगी महाराणा प्रताप यांची आरती करण्यात आली. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत, मिरवणुकीच्या माध्यमातून महाराणा प्रताप यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला, लोहार समाजाच्या उत्सवात सहभागी होऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
या प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी सरचिटणीस युवराज पवार, हरीश डोळस, हिराचंद जाधव, महेश नांद्रे, कुणाल भोसले हे पदाधिकारी उपस्थित होते.