महापालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त अभिवादन
थोर पराक्रमी राजे महाराणा प्रतापसिंह यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्य आणि स्वाभिमानासाठी दिलेले योगदान भारतीय इतिहासात अजरामर -उपमहापौर शर्मिला बाबर
पिंपरी, ता. १७ - थोर पराक्रमी राजे महाराणा प्रतापसिंह यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्य आणि स्वाभिमानासाठी दिलेले योगदान भारतीय इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या शौर्य, त्याग, संघर्ष आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवनकार्याचे स्मरण करून त्यांच्या शौर्य व स्वाभिमानाचा वारसा सर्वांनी जोपासावा असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.
महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी नगरसदस्य प्रा. उत्तम केंदळे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, माजी नगरसदस्या सुमन पवळे, उपआयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते अशोक इंगळे, प्रवीण राजपूत, ललित पवार, श्रीराम परदेशी,कल्याणसिंग राजपूत,भावेश गिरासे,सागरसिंग बघेल, डॉ. सुरेश सूर्यवंशी, रुपेश राजपूत, जितेंद्र पाटील, नितीन पाटील, राजेंद्रसिंग राठोड, महेंद्रसिंग गिरासे, मुकेश राणा, गणेश राजपूत, शुभम राजपूत, महेश पाटील, विनोद जाधव, परमेश्वर सोळंकी, एकनाथ पवार, ईश्वर परमार, चतुर्भुज चव्हाण, योगेश प्रतापसिंग तसेच राजपूत समाजाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
- शौर्य आणि त्याग, bravery and sacrifice
- प्रतिमा पूजन, garlanding ceremony, निगडी पुतळा
- महाराणा प्रतापसिंह अभिवादन, tribute to Maharana Pratap
- पिंपरी चिंचवड महापालिका, Pimpri Chinchwad Municipal Corporation, उपमहापौर शर्मिला बाबर, Deputy Mayor Sharmila Babar,
- महाराणा प्रतापसिंह जयंती, Maharana Pratap Jayanti