बांधकाम साईटवरुन अॅल्युमिनीयम प्लेट्स चोरणाऱ्या चार आरोपींना अटक, ३१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, चाकण पोलिसांची कामगिरी

बांधकाम साईटवरुन अॅल्युमिनीयम प्लेट्स चोरणाऱ्या चार आरोपींना अटक, ३१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, चाकण पोलिसांची कामगिरी

बांधकाम साईटवरुन अॅल्युमिनीयम प्लेट्स चोरणाऱ्या चार आरोपींना अटक, ३१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, चाकण पोलिसांची कामगिरी 

पिंपरी, ता. २८ - चाकण नगरपरिषद हद्दितील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरु असलेल्या बांधकाम साईटवरुन अॅल्युमिनीयम प्लेट्स चोरणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून ३१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चाकण गावच्या हद्दित राक्षेवाडी येथील प्रधानमंत्री आवास योजना अंर्तगत २१० घरांचे बांधकाम सुरु आहे. तेथून दिनांक १० एप्रिल २०२६ ते १६ एप्रिल २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी २०,००,०००/- किंमतीच्या २८० स्क्वेअर मिटर अॅल्युमिनीयमच्या बांधकामासाठी आणलेल्या सेट्रींग प्लेट्सची चोरी झाल्याने चाकण उत्तर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द दिनांक १८ एप्रिलला गुन्हा दाखल झाला होता. 

या गुन्ह्याचा तपास करताना घटनास्थळी एक बेवारस स्थितीत मोटारसायकल सापडली. त्यावरुन तांत्रिक तपास करुन पोलिसांनी मोटारसायकलच्या मूळ मालकाचा शोध घेतला. घटनस्थळाच्या परीसरातील सी.सी.टि.व्ही कॅमेऱ्यांची बारकाईने पाहणी केली. त्याधारे, या गुन्हयातील प्रमुख आरोपी  रामरक्षा उर्फ राजु धर्मराज पासवान (वय ४०, रा. सुसगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करताना त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली व त्यानुसार पोलिसांनी अन्य तीन आरोपींना खेड तालुक्यातील येलवडी येथून अटक केली. आरोपी स्वराज शांताराम कालापाड (वय २३ वर्षे), स्वप्नील शांताराम कालापाड (वय २५ वर्षे) व अक्रम रफिकउल्ला खान (वय २८ वर्षे) या रामरक्षा याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी करण्यासाठी वापरलेली दोन चारचाकी वाहने, चोरीस गेलेल्या अॅल्युमीनीयमच्या सेट्रींग प्लेटा, दोन मोटार सायकल असा एकूण ३१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर,  अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त -परीमंडळ ३ मारुती जगताप, सहा पोलीस आयुक्त चाकण विभाग सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनोद पाटील. तपास पथकातील चंद्रशेखर मोरखंडे पोलीस उप निरीक्षक, हवालदार ११२२ - यादव,  १८०५ - ढमढेरे, १२८१ - कोळेकर, पोलिस शिपाई ३५४७ - कोळी,  २३११ - लोखंडे, ४५७४ - जगझाप यांनी केली आहे.


  


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories