नशेत विजेच्या खांबावर चढून बसलेला तरुण अन्  खाली बघ्यांची गर्दी .... निगडीतील घटना

नशेत विजेच्या खांबावर चढून बसलेला तरुण अन् खाली बघ्यांची गर्दी .... निगडीतील घटना

नशेत विजेच्या खांबावर चढून बसलेला तरुण अन्  खाली बघ्यांची गर्दी .... निगडीतील घटना

पिंपरी, ता. २८ - निगडी परिसरात सोमवारी (ता. २७) रात्री एका नशेत असलेल्या आणि मानसिकरित्या अस्थिर असलेल्या तरुणाने उच्चदाबाच्या वीजेच्या खांबावर चढून सर्वांनाच घोर लावला. खांबावर विजेचा प्रवाह सुरु असल्याने त्या तरुणाला पाहताना तिथे असलेल्या सर्वांच्या मनाचा थरकाप उडाला होता.  त्याला बघण्यासाठी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अडीच-तीन तास हा तरुण खांबावरच होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी या तरुणाला सुखरुपणे खाली उतरवले. 

या माहिती मिळताच पोलिस व अग्निशामक दलाचे पथक तत्काळ तिथे दाखल झाले. प्रशासनाने तातडीने वीजपुरवठा खंडित केला.  अग्निशमन दलाच्या जवानांनी खांबावर चढून त्या तरुणाला सुरक्षित खाली उतरवले. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories