हिंजवडीत अनधिकृत होर्डिंग काढण्याच्या कारवाई दरम्यान क्रेन दुकानावर पलटली
पिंपरी, ता. १ ऑगस्ट २०२६ - आयटी पार्क हिंजवडी परिसरात 'पीएमआरडीए'कडून अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरु असताना एका दुकानावर मोठी क्रेन पलटी झाली. शुक्रवारी (ता. ३१) दुपारी ही घटना घडली.
पीएमआरडीए तर्फे हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरामध्ये अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करण्यात येत आहे. अनधिकृत होर्डिंगवर काढण्यासाठी पीएमआरडीएने एक मोठी क्रेन बोलवली होती. काम सुरु असताना ही क्रेनच एका दुकानावर पलटली.
या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र क्रेनचे आणि एका दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.