महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा सिंहासनाधिष्ठीत पुतळा उभारावा, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची मागणी

महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा  सिंहासनाधिष्ठीत पुतळा उभारावा, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची मागणी

महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा  सिंहासनाधिष्ठीत पुतळा उभारावा, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची मागणी 

पिंपरी, ता. १ ऑगस्ट  २०२६ -  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चिंचवड येथे साकारत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारती समोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठीत पुतळा उभारावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनामध्ये मारुती भापकर यांनी म्हटले आहे की,न पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या चिन्हामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा  सिंहासनाधिष्टीत भव्य दिव्य पुतळा उभारण्यास मान्यता देऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करावे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात समान न्याय, शिस्त, कायदयाची जरब, रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नये असा पारदर्शक,आदर्श भ्रष्टाचार विरहित कारभार, महिलांचा सन्मान हे आदर्श होते. दररोज महाराजांच्या पुतळ्याकडे पाहताना सर्वांना महाराजांच्या आदर्शांची आठवण होऊन महानगरपालिकेचे पदाधिकारी,नगरसेवक व प्रशासनातील  लोकही तसे काम करतील. तसेच मुख्यालयातील प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पमाळ अर्पण करून, महाराजांना नम्र मुजरा करून कामाची सुरुवात करता येईल. पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर महाराजांना अभिवादन करूनच पदाधिकारी आपल्या कामाची सुरुवात करतील. 

 हा अत्यंत महत्त्वाचा व आपल्या अस्मितेचा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने या विषया संदर्भात आपण तातडीने योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे काम होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories