विनापरवाना काडतूसासह पिस्तूल बाळगणाऱ्या दोन युवकांना अटक
पिंपरी, ता. ३० - घातक शस्त्र बाळगण्यास बंदी आदेशाचे उल्लंघन करुन पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी दोन युवकांना पिंपरी-चिंचवड युनिट - २ च्या पथकाने सोमवारी (ता. २९) अटक केली आहे. सोमाटणे फाटा येथे देहूरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेल न्यू डायमंडसमोर ही करवाई करण्यात आली.
याबाबत, गुन्हे शाखा युनिट - २ चे पोलिस शिपाई अजिनाथ राणे यांनी तक्रार नोंदवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पप्पू उर्फ विनोद राकेश पवार (वय २६ वर्षे रा. बुद्धविहारासमोर, दत्तनगर, चिंचवड) आणि रोहन सिताराम सावंत (वय २४ वर्षे, रा. दत्तमंदिराशेजारी, दत्तनगर, चिंचवड) या दोघांनी प्रत्येकी एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक काडतूस बेकायदेशीररित्या बाळगले होते.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या घातक शस्त्रबंदी (सोटे, भाले, चाकु, सुरा, कोयता, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे व इतर यास बंदी आदेश) आदेशाचे उलंघन करुन त्यांनी दोन पिस्तूले व दोन काडतूसे जवळ बाळगली होती. पोलिसांनी आरोपी युवकांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम - १९५९ चे कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२,३७(१) (३) सह १३५, भारतीय न्याय संहिता कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- बेकायदेशीर शस्त्र जप्त, illegal firearms seized, तळेगाव दाभाडे पोलिस, Talegaon Dabhade police
- Crime Branch, युनिट २ कारवाई, Crime Branch Unit 2 action, देशी बनावटीचे पिस्तूल, country-made pistol
- सोमाटणे फाटा कारवाई, Somatane Phata police action, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा
- जिवंत काडतूस जप्त, live cartridges seized, दोन युवक अटक, two youths arrested
- विनापरवाना पिस्तूल, illegal pistol possession