सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी सायबर पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी सायबर पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी सायबर पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

संशयास्पद 'Zip File'व  'APK' फाईलव्दारे होणाऱ्या फसवणुकीबाबत सविस्तर माहिती 

पिंपरी, ता. १ - सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद 'Zip File'व  'APK' फाईलव्दारे होणाऱ्या फसवणुकीबाबत सायबर पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे. 

पोलिसांनी सांगितले आहे की, खासगी कंपनीमधील वरिष्ठ अधिकारी तसेच नामवंत व्यवसायिक व्यक्ती यांचे व्हॉटसअॅप हॅक करुन त्याव्दारे त्यांच्या संपर्क यादीमधील (कॉन्टॅक्ट लिस्ट) कर्मचारी, नातेवाईक व मित्र परिवार यांना 'Zip File' व 'APK'फाईल व्हॉटसअॅपव्दारे पाठविली जाते. नमूद व्हॉटसअॅपचा प्रोफाईल फोटो हा व्हॉटसअॅप हॅक झालेल्या तक्रारदाराचा ठेवला जातो. सायबर गुन्हेगार हे 'Zip File' व 'APK'फाईलला बॅंक स्टेटमेंट किंवा अकाऊंट स्टेटमेंट असे नाव देतात.

सायबर गुन्हेगार वर नमूद 'Zip File' व 'APK'फाईल ही कंपनीतील इतर व्यक्तींना पाठवून संगणक/लॅपटॉप/मोबाईल फोनवर उघडण्यासाठी सांगितली जाते.

नमूद 'Zip File' व 'APK'फाईल ओपन केल्यानंतर संगणक/लॅपटॉप/मोबाईल फोन मध्ये मालवेअर / व्हायरसचा प्रवेश होतो. संगणकात दोष निर्माण (डॅमेज) होतात आणि संक्रमित संगणकीय साधन सामुग्रीचा वापर करुन डेटा चोरी करतात तसेच बँकेची संवेदनशील माहीती प्राप्त करुन आर्थिक फसवणूक केली जाते.

- अशा प्रकारची फसवणुक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी -

अनोळखी व्हॉटसअॅप नंबरव्दारे प्राप्त झालेली 'Zip File' व 'APK'फाईल ओपन करण्यापूर्वी पाठविणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल नंबर पडताळून पाहावा.

सदर व्हॉटसअॅप मेसेजमध्ये आर्थिक व्यवहार करण्यास सांगितले असता त्याबाबत पाठविणाऱ्या अधिकृत व्यक्तीला संपर्क करुन आर्थिक व्यवहार करावा.

सोशल मिडीयाव्दारे प्राप्त 'Zip File' व 'APK' फाईल ओपन करु नये. तुमच्या व्हॉटसअॅप इतर अनोळखी डिव्हाईसला लिंक असल्यास ते रिमूव्ह करावे.

व्हॉटसअॅपचे Two Step व्हेरीफीकेशन करावे.


- आपली संगणकीय साधनसामुग्री / मोबाईल फोन संक्रमित झाला आहे काय याबाबत खात्री करण्यासाठी 'Indian Computer Emergency Response Team (CERT-In), Ministry of Electronics and IT, MicroWorld has built a Bot Removal Tool' व्दारे तपासणी करावी.


- तुमच्या मोबाईल फोन व संगणकामध्ये अद्ययावत Antivirus ठेवावा.

- फसवणुक झाल्यास www.cybercrime.gov.in अथवा 1930 हेल्पलाईनवर संपर्क साधावा.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories