अल्पवयीन गुन्हेगारांनी कोयत्याने तोडला एका मुलाच्या हाताचा अंगठा, देहूरोडमधील गंभीर प्रकार

अल्पवयीन गुन्हेगारांनी कोयत्याने तोडला एका मुलाच्या हाताचा अंगठा, देहूरोडमधील गंभीर प्रकार

अल्पवयीन गुन्हेगारांनी कोयत्याने तोडला एका मुलाच्या हाताचा अंगठा, देहूरोडमधील गंभीर प्रकार 

पिंपरी, ता. २२ - दोन दिवसांपूर्वी मोटारसायकलवरुन कट मारुन गेल्याच्या कारणाने तीन अल्पवयीन गुन्हेगारांनी एका मुलाला जबर मारहाण केली आणि एका आरोपीने त्या मुलाच्या हाताचा अंगठा अक्षरशः तोडून टाकला आहे. सर्व पालकांना विचार करायला लावणारा हा गंभीर प्रकार रविवारी (ता. २१) सायंकाळी ५ च्या सुमारास देहूरोडमध्ये घडला आहे. या प्रकरणी तिन्ही अल्पवयीन गुन्हेगारांवर देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत, जखमी मुलगा तुषार मासे याचे वडील शशिकांत नागेश मासे (वय-४३ वर्षे, रा. पोर्टर चाळ, देहूरोड) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तुषार आणि त्याचा मित्र अर्जुन भुंभक हे रविवारी (ता. २१) सायंकाळी ५ च्या सुमारास जितू पान टपरी समोरील रस्त्यावर दुचाकीवर उभे होते. त्यावेळी, आरोपी असलेल्या तीन अल्पवयीन गुन्हेगारांनी दोन दिवसांपूर्वीच्या कट मारल्याच्या कारणाने, राग मनात धरुन तुषारला शिवीगाळ करत  लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. एकाने लोखंडी कोयत्याने तुषारच्या उजव्या हाताचा अंगठा तोडून अक्षरशः पंजापासून वेगळा केला आहे. 

आरोपींवर  देहूरोड पोलिस ठाण्यात  भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२), ११५ (२) ३५२, ३५१ ? (7)(3) ,3(4) तसेच शस्त्र अधि ४,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories