सांगवीमध्ये इसमाची नोकरीचे आमिष दाखवून १ लाख ७१ हजारांची ऑनलाईन फसवणूक

सांगवीमध्ये इसमाची नोकरीचे आमिष दाखवून १ लाख ७१ हजारांची ऑनलाईन फसवणूक

 सांगवीमध्ये इसमाची नोकरीचे आमिष दाखवून १ लाख ७१ हजारांची ऑनलाईन फसवणूक

पिंपरी, ता. २२ - लिंक्ड इन व व्हॉट्स्अॅपद्वारे संपर्क करुन नोकरीचे आमिष दाखवून एका इसमाची १ लाख ७२ हजार २०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली गेली आहे. . हा प्रकार १९ नोव्हेंबर २०२०५ पासून ते ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत घडला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात रविवारी (ता. २१) सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत, संबंधित इसमाने पोलिसांत तक्रार दिली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १) पे पाल (Pay Pal) कंपनीचा डायरेक्टर गौरव शर्मा असे भासवलेला अनोळखी व्यक्ती, २) व्हॉट्स अॅप नंबर ९०३०१८३३९६ धारक, ३)  आर. कुमार एस. नावाने असलेला बॅंक खातेधारक हे आरोपी आहेत. 

दिनांक  १९ नोव्हेंबर २०२० ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आरोपींनी लिंक्डइन व एका व्हॉट्सॲप क्रमांकावरून फिर्यादीशी संपर्क साधला. पे पाल (PayPal) कंपनीमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी प्रभावी जॉब प्रोफाइल तयार करून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर खोट्या मुलाखती घेऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी इसमाचा विश्वास मिळवला आणि काहीतरी खोटे सांगून पैशाची आवश्यकता असल्याचेही सांगितले. पुढे, आर. कुमार एस. नावाने असलेल्या एका बॅंक खात्यावर    एकूण १,७२,२००/- रुपये ऑनलाईन पाठवण्यास भाग पाडून फिर्यादीची ऑनलाईन आर्थीक फसवणूक केली. 

याबाबत, आरोपींविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात  भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करत आहेत. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories