news
clock
देहूरोड येथे बांधकाम साईटवर उंचावरुन पडून कामगाराचा मृत्यू, तिघांविरोधात गुन्हा

देहूरोड येथे बांधकाम साईटवर उंचावरुन पडून कामगाराचा मृत्यू, तिघांविरोधात गुन्हा

देहूरोड येथे बांधकाम साईटवर उंचावरुन पडून कामगाराचा मृत्यू, तिघांविरोधात गुन्हा

पिंपरी, ता. २६ - देहूरोड परिसरातील मामुर्डी येथील बांधकाम साईटवर निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास कात्रज-मुंबई जुन्या महामार्गालगत असलेल्या एक्सेल टेक्नोव्हेंचर्स प्रा. लि. यांच्या साईटवर घडली. मात्र, याबाबतचा गुन्हा बुधवारी (ता. २५) नोंदविण्यात आला.

या प्रकरणी सावन कुमार विश्वनाथ वाघमारे (वय ३३, पोलीस उपनिरीक्षक, देहूरोड पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गोकुळ कन्स्ट्रक्शनचे मालक राकेश गजेरा (पूर्ण पत्ता अज्ञात), लेबर कॉन्ट्रॅक्टर आकाश देवेंद्र सोनपाळे (वय ४०) आणि साईट सुपरवायझर देवेंद्र रेमंड यादव (वय ४०) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

संबंधित आरोपींनी त्यांच्या साईटवरील कामगार कुंडी उर्फ फुलचंद्र चौहान (मूळ रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) याला सेफ्टी जॅकेट, हेल्मेट व शूज ही सुरक्षा साधने उपलब्ध करुन दिली नव्हती. पार्किंगमधील डक्टजवळ कोणतेही सुरक्षात्मक बॅरिकेडिंग, सूचना फलक किंवा सुरक्षा जाळी लावण्यात आलेली नव्हती.

याच निष्काळजीपणामुळे चौहान हे पार्किंगमधील (मोकळ्या मार्गिकेतून) डक्टमधून बेसमेंटमध्ये पडले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories