मुंबई-पुणे महामार्गावरील विकासकामांची उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून पाहणी

मुंबई-पुणे महामार्गावरील विकासकामांची उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून पाहणी

मुंबई-पुणे महामार्गावरील विकासकामांची उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून पाहणी

रावेत येथील स्पा सेंटर मालकाला मागितली ५० हजारांची खंडणी प्रगतीचा आढावा; नागरिकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देण्याच्या सूचना

पिंपरी, ता. १८ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील मुंबई-पुणे महामार्गावरील सुरू असलेल्या विविध विकासकामांची उपमहापौर शर्मिला बाबर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला. तसेच कामांदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणींची माहिती घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पीसीएमसी मेट्रो स्टेशन ते निगडी या मार्गावरील विविध विकासकामांच्या अनुषंगाने गुरुवार, दि. १८ जून २०२६ रोजी आयोजित पाहणी दौऱ्यात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांच्या प्रगतीची सविस्तर माहिती घेतली. विकासकामे दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याबरोबरच नागरिकांना होणारा त्रास कमीत कमी ठेवण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

कामांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाबी तसेच इतर नागरी समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले. विकासकामे करताना नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि सोयीसुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी राहुल पाटील, उपअभियंता (शहरी दळणवळण), विपिन थोर मोठे, कनिष्ठ अभियंता, प्रसन्न देसाई, आर्किटेक्ट (शहरी दळणवळण), योगेश शिंदे, प्रकल्प सल्लागार (शहरी दळणवळण) तसेच इमरान पठाण, बीट निरीक्षक, अ प्रभाग उपस्थित होते.

पाहणीदरम्यान उपमहापौर शर्मिला बाबर यांनी प्रत्यक्ष स्थळभेट देऊन विविध कामांच्या प्रगतीची पाहणी केली तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आणि विकासकामे अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories