कंटेनरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा

कंटेनरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा

कंटेनरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा

पिंपरी, ता. १६ - तळेगाव चौक-चाकण (ता. खेड) परिसरात कंटेनरच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (ता. १४) रात्री घडला आहे. या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तळेगाव चौक येथे कंटेनर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत एका महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेच्या पाय व कंबरेवरून कंटेनरचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या व बेशुद्ध पडल्या.

घटनेनंतर उपस्थित नागरिक व ॲम्ब्युलन्स चालक साईनाथ महादेव माकणे यांनी जखमी महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून सोमवारी (ता. १५) पहाटे दीड वाजता त्यांना मृत घोषित केले.

मृत महिलेचे नाव रोहिणी हिरासिंग दुरवेरा (रा. आंबेठाण, ता. खेड) असे असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या प्रकरणी कंटेनर चालक शंकर बळीराम जाधव (वय ३८, रा. रांजणगाव, ता. शिरूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या घटनेचा पुढील तपास चाकण पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories