news
clock
दिघी मॅगझिन परिसरात अनधिकृतपणे ड्रोन उडविणाऱ्या तरुणावर गुन्हा

दिघी मॅगझिन परिसरात अनधिकृतपणे ड्रोन उडविणाऱ्या तरुणावर गुन्हा

दिघी मॅगझिन परिसरात अनधिकृतपणे ड्रोन उडविणाऱ्या तरुणावर गुन्हा

पिंपरी, ता. २३ - दिघी मॅगझिन परिसरात मनाई असलेल्या क्षेत्रात एक २० वर्षीय तरुण शनिवारी (ता. २१)  अनधिकृतपणे ड्रोन उडवत होता.  सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात रविवारी (ता. २२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी पोलिस शिपाई पिल्लीकोटेश्वर राव (वय ५२, रा. खडकी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी सागर धर्माजी विटकर (वय २०, रा. भोसरी, पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, ३२९(३) व १२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्याला बीएनएसएस कलम ३५(३) प्रमाणे नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

पोलिस दिघी मॅगझिन गार्ड येथे ड्युटीवर असताना संबंधित तरुणाने कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडवत असल्याचे आढळले. या कृतीमुळे मानवी सुरक्षिततेला धोका निर्माण होत होता. तसेच, परिसरात प्रवेशास सक्त मनाई असतानाही आरोपीने फेन्सिंग वॉलवरील तार उचलून आतमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories