news
clock
औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विकासकामांसाठी वृक्षतोडीच्या प्रस्तावाला नागरीकांचा तीव्र विरोध

औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विकासकामांसाठी वृक्षतोडीच्या प्रस्तावाला नागरीकांचा तीव्र विरोध

औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विकासकामांसाठी वृक्षतोडीच्या प्रस्तावाला नागरीकांचा तीव्र विरोध 

पिंपरी, ता. २३ - पुणे महानगरपालिकेच्या औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध विकासकामे, रस्ता रुंदीकरण यासाठी परिसरातील एकूण ६९८ झाडे तोडण्याचे प्रस्तावित आहे. या प्रस्तावाविरोधात औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयात सुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, चुकीच्या बाबी नागरीकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने पुन्हा नव्याने सुनावणी आयोजित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

वृक्षतोडीच्या या प्रस्तावाविरोधात दोन हजारांहून अधिक हरकती दाखल झाल्या आहेत. मात्र, हरकतींची अधिकृत संख्या सांगण्यास मुद्दाम टाळाटाळ करण्यात आली. ही वृक्षतोड बाणेर रामनदी काठी व परिसरात होणार असल्याने बाणेर बालेवाडी भागातील नागरीक मोठ्या संख्येने सुनावणीसाठी उपस्थित होते. यावेळी, नागरिकांनी सदर सुनावणी यादी चुकीची आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा अस्तित्त्वात आल्याने प्रशासक म्हणून पालिका आयुक्त हे प्रभारी वृक्ष अधिकारी राहू शकत नाहीत. त्यामुळे नवीन प्राधिकरण अस्तित्त्वात येईपर्यंत कोणतीही सुनावणी काढता येणार नाही, हे निदर्शनास आणून दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, हेही सांगितले. 

त्यावर, वृक्ष अधिकारी व उपायुक्त विजय नायकल यांनी सुनावणी यादी रद्द करुन पुन्हा नव्याने सुनावणी आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories