दिघीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला १२ तासांत अटक, दिघी पोलिसांची कामगिरी

दिघीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला १२ तासांत अटक, दिघी पोलिसांची कामगिरी

दिघीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला १२ तासांत अटक, दिघी पोलिसांची कामगिरी 


पिंपरी,  ता. १८ - दिघी परिसरातील वृद्धेचा खून करणाऱ्या आरोपीला दिघी पोलिसांच्या तपास पथकाने १२ तासांत अटक केली आहे.  आरोपीला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले आहे. 

काळजेवाडी चऱ्होली बुद्रुक येथे शकुंतला काळुराम गिलबिले (वय ७५ वर्षे) या घरी एकट्या असताना अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी त्यांचा गळयावर घातक हत्याराने वार करुन खून केला होता. याबाबत, शकुंतला यांचे पुतणे राजेंद्र लालासाहेब गिलबिले यांनी तक्रार दिली होती. अज्ञात आरोपीविरोधात दिघी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खूनचा तपास करण्यासाठी दिघी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने त्वरीत घटनास्थळी पोचून मयत शकुंतला यांचे नातेवाईक व आजूबाजूच्या लोंकाकडून सखोल माहिती घेतली. घटनास्थळाच्या आजूबाजूचे अनेक सीसीटीव्ही फुटेज पाहून माहिती संकलित केली. मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून संभाजीनगर परिसरात रवाना झाले. तेथून  आरोपी भगवान दगडुजी पाटील (वय ४८ वर्षे, शेती रा. भवानीनगर, कायगाव रोड, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर) या संभाजीनगर परिसरातून मोठया शिताफीने ताब्यात घेतले. आरोपी हा मयत शकुंतला यांच्या शेतात काम करणारा मजूर आहे. सदर आरोपीने गुन्हयाची कबुली दिली आहे.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त  विनय कुमार चौबे, पोलिस सह आयुक्त  शशिकांत महावरकर, अप्पर पोलिस आयुक्त बसवराज तेली, पोलिस उप आयुक्त परिमंडळ -३ मारूती जगताप, सहा पोलिस आयुक्त भोसरी एमआयडीसी विभाग, पिंपरी चिचंवड सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक गुन्हे विनायक पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीनिवास कामुनी, पोलिस उपनिरीक्षक आबा कटपाळे तसेच पोलिस अंमलदार नितीन तारडे, राम बहिरट, राहुल लोणकर, प्रमोद गाडे, नितीन लवटे, राहुल वाघमारे, सुधीर डोळस, सोमा खळसोडे, दत्ता मुंढे यांचे पथकाने केली आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories