विविध प्रश्नांबाबत शिवसेनेचा (उबाठा) महापालिकेवर मोर्चा

विविध प्रश्नांबाबत शिवसेनेचा (उबाठा) महापालिकेवर मोर्चा

विविध प्रश्नांबाबत शिवसेनेचा (उबाठा) महापालिकेवर मोर्चा 

पिंपरी, ता. १८ - शहरातील विविध प्रश्नांबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेवर जागर मोर्चा काढण्यात आला. पक्षाचे शहराध्यक्ष चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चामध्ये शिवसैनिकांनी महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.  

एम्पायपर इस्टेट-चिंचवड येथून सुरवात झालेला हा मोर्चा महापालिकेवर येऊन धडकला. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुनावळे येथील शाळेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचे खासगी संस्थेस हस्तांतरण, महापालिकेच्या शालेय साहित्यातील घोटाळा, पवना नदी प्रदूषण, शहरातील नालेसफाई, ताथवडे येथील मोकळ्या जागेत निर्माण झालेले कचऱ्याचे साम्राज्य या महत्त्वाच्या विषयांवर आंदोलकांनी प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. 

यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष चेतन पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, '' झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आज जागर मोर्चाचे आयोजन आम्ही केले होते.'' ''सध्या पुनावळे येथील शाळेसाठी आरक्षित भूखंड हस्तांतरणाचा विषय महत्त्वाचा आहे. मोठा विरोध होऊनही हा भूखंड खासगी संस्थेला हस्तांतरीत का केला गेला, महापौर व आयुक्तांवर कोणाचा दबाव होता.'' असा प्रश्न उपस्थित करत पवार यांनी प्रशासन व महापौरांवर टिका केली. विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसला भाजपची बी टीम आहे, असे पवार म्हणाले.  नागरीकांनी नगरसेवकांना विश्वासाने निवडून दिले मात्र त्यांनी जनतेचाच खेळखंडोबा केला आहे, अशा शब्दांत त्यांनी नगरसेवकांवर टिका केली.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories