डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने व्यावसायिकाची ५ लाख २२ हजारांची ऑनलाइन फसवणूक

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने व्यावसायिकाची ५ लाख २२ हजारांची ऑनलाइन फसवणूक

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने व्यावसायिकाची ५ लाख २२ हजारांची ऑनलाइन फसवणूक

पिंपरी, ता. २९ - डिलिव्हरी फ्रँचायझी देऊन मोठा आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची ५ लाख २२ हजार ८३७ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अतुल नामदेव वहिले (वय ३८, रा. व्हिजन रिदम सोसायटी, डुडुळगाव, ता. हवेली) यांना इन्स्टाग्रामवरील 'DELHIVERY FRANCHISE'जाहिरात तसेच एका ई-मेल आयडीद्वारे संपर्क साधण्यात आला. त्यानंतर प्रियांका सिंग, सौरभ कुमार आणि अन्य मोबाईल क्रमांकांवरून व्हॉइस कॉल व व्हॉट्सअॅप संदेश पाठवून डिलिव्हरी फ्रँचायझीमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.

आरोपींनी विविध कागदपत्रे ई-मेलद्वारे पाठवून विश्वास संपादन केला. त्यानंतर २१ मे ते २० जून २०२६ या कालावधीत फिर्यादींना विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण ५,२२,८३७ रुपये जमा करण्यास प्रवृत्त केले. पैसे जमा केल्यानंतर कोणताही लाभ न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले.

याप्रकरणी २८ जून रोजी सायंकाळी ४.४५ वाजता दिघी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ मधील कलम ६६(सी) व ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories