news
clock
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

पुणे, ता. २६ - ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे गुरुवारी (ता. २६) निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. गुरुवारी (ता. २६) सकाळी त्यांचं कार्डियॅक अरेस्टमुळे निधन झाले.

इतिहास संशोधन क्षेत्रातील अनमोल कार्यासाठी म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुण्यात माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते शाहू चरित्र (इंग्लिश) या ग्रंथाचे प्रकाशन करून शाहूचरित्रकार म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला. डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एम.ए. (सर्वप्रथम) आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. एम.ए. ला शिवाजी विद्यापीठात पहिले आले होते. तेव्हापासूनच त्यांच्या संशोधक कारकीर्दीस प्रारंभ झाला.  तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन क्षेत्रात विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. महाविद्यालयातील एम.ए.पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 20 क्रमिक पुस्तके लिहिली. त्यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ इत्यादी एकूण 25पेक्षा अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले. 

अनेक इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान डॉ. पवार यांनी भूषविले. इतिहास परिषदांमध्ये तसेच संशोधनपर नियतकालिकांत त्यांचे 45हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक - सदस्य आणि  अध्यक्ष होते. त्यांनी 1992 मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक-संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. इतिहास संशोधन व त्याद्वारा समाजप्रबोधन हे त्यांचे उद्दिष्ट असून, त्यानुसार संस्थेतर्फे 1200 पानांचा, तीन खंडांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ 2001 मध्ये प्रसिद्ध केला. 

महाराष्ट्राचा इतिहास, राजर्षी शाहू चरित्र व कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहास इत्यादी ग्रंथांचे संपादन त्यांनी केले. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व कार्य या मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांतील ग्रंथांचे प्रकाशन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. पवार यांनी ऐतिहासिक, तसेच इतर अनेक विषयांवरील २५पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले.  इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी डॉ. पवार यांना अनेक सन्मान प्राप्त झाले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories