जागतिक नृत्य दिनानिमित्त नृत्यकला मंदिरतर्फे बुधवारी निगडी-प्राधिकरणात 'नृत्य महोत्सव'
Apr 28 2026
66
जागतिक नृत्य दिनानिमित्त नृत्यकला मंदिरतर्फे बुधवारी निगडी-प्राधिकरणात 'नृत्य महोत्सव'
पिंपरी, ता. २८ - जागतिक नृत्य दिन २९ एप्रिलला साजरा होत आहे. त्यानिमित्त नृत्यकला मंदिर व नृत्यतेज अकादमीच्या वतीने बुधवारी (ता. २९) नृत्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवातून ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.
निगडी-प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रमाची सुरवात होईल. यावेळी मिस इंडिया किताब विजेत्या ईशा अगरवाल, डॉ. दिपक हारके व नगरसेवक अमित गावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
महोत्सवात इंडियन फोक, सेमीक्लासिकल, बॉलिवूड, बेलीडान्स, कन्टेम्पररी या प्रकारांमधील नृत्याविष्कार रसिकांना पाहायला मिळणार आहे. हे नृत्याविष्कार ७० नर्तक हे सादर करणार आहेत. यावेळी, नृत्यदिग्दर्शक सचिन शिरसाट, नृत्यांगना सिमरन पवार व बालकलाकर इशिता बरवाड यांना पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
स्फूर्ती देणारे नृत्य पाहण्यासाठी व नृत्याची आवडजोपासण्यासाठी रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन नृ्त्य कलामंदिरच्या संस्थापक तेजश्री अडिगे यांनी केले आहे.
- Choreographer Sachin Shirsat, Dancer Simran Pawar, Child Artist Ishita Barwad, Awards,
- Dance Festival, Nigdi-Pradhikaran, G. D. Madgulkar Natyagruh
- World Dance Day, Nrityakala Mandir,
- इंडियन फोक, सेमीक्लासिकल, बॉलिवूड, बेलीडान्स, कन्टेम्पररी, नृत्याविष्कार
- निगडी-प्राधिकरण, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह,
- जागतिक नृत्य दिन, नृत्यकला मंदिर, नृत्य महोत्सव,