नसलेला आर्थिक व्यवहार लादून दुकानदाराला मागितलीये १ लाख ७० हजार रुपये खंडणी

नसलेला आर्थिक व्यवहार लादून दुकानदाराला मागितलीये १ लाख ७० हजार रुपये खंडणी

नसलेला आर्थिक व्यवहार लादून दुकानदाराला मागितलीये १ लाख ७० हजार रुपये खंडणी

पिंपरी, ता. २० - नसलेला आर्थिक व्यवहार दुकानदारावर लादून त्या दुकानदारांकडून १ लाख ७० हजार रुपये खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील आरोपी १ मार्च २०२५ पासून ते एप्रिल २०२६ पर्यंत दुकानदाराकडून खंडणी मागत आहे. या आरोपीच्या धाकामुळे दुकानदाराने एकूण ७ लाख ९ हजार ९००/- रुपयांचा एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन व ५ ग्रॅम वजनाची अंगठीदेखील आरोपीला दिली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात रविवारी (ता. २०) चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुकानदार कैलास भास्कर चौधरी (वय ४७ वर्षे, व्यवसाय रा. रुपीनगर तळवडे) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. आरोपीचे नाव सचिन उर्फ तानाजी नायकुडे (रा. 'रुपीनगर, तळवडे) असून त्याला अजून अटक झालेली नाही. आरोपी सचिनने फिर्यादी कैलास यांना म्हटले की,  ''तू संगिता व्हनमाने यांच्याकडून घेतलेले पैसे मी दिले होते. ते पैसे मला मिळालेले नाहीत. ते पैसे तू मला दे.''  तेंव्हा फिर्यादी कैलास यांनी सचिनला व्हनमाने व त्यांचा आर्थिक व्यवहार २०१५ मध्येच पूर्ण झाला आहे, असे सांगितले व मी ''तुला का पैसे देऊ'' अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने  कैलास यांना धमकी दिली. ''तू जर मला पैसे नाही दिले तर मी तुला येथे व्यवसाय करु देणार नाही, तुझे शॉप बंद पाडेन, तुझ्या शॉपमध्ये गांजा आणून ठेवून तुझ्यावर केस करुन तुला जेलला पाठवेन.'' अशी धमकी दिली. 

त्यामुळे कैलास यांनी वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांना घाबरुन आरोपी सचिनला आत्तापर्यंत  एकूण ७ लाख ९ हजार ९००/- रुपये एक सॅमसंग कंपनीचा फोन व ५ ग्रॅम वजनाची अंगठी दिली. आरोपी सचिन पुन्हापुन्हा कैलास यांना धमकी देवून १ लाख ७० हजार रुपयांची खंडणी मागत आहे. आरोपीविरोधात चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories