news
clock
शेतीच्या जुन्या वादातून महिलेला जीवे मारण्याची धमकी

शेतीच्या जुन्या वादातून महिलेला जीवे मारण्याची धमकी

 शेतीच्या जुन्या वादातून महिलेला जीवे मारण्याची धमकी 

पुणे, ता. २० - जुन्या शेतीचे वादाचे रागातून एका २९ वर्षीय युवकाने एका महिलेला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार १९ एप्रिलला चोरघेवाडी (ता. खेड) येथे महिलेच्या घराजवळ घडला. आरोपी युवकाविरोधाक उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मारहाण झालेल्या महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर लक्ष्मण चोरघे (वय २९) याने पूर्वीच्या शेतीविषयक वादातून महिलेशी वाद घातला. महिलेला "पाईप लाईन का फोडणार आहेस?" असे विचारले. यावरुन त्याने महिलेला शिवीगाळ केली आणि हाताने तसेच दगडाने मारहाण केली. आरोपीने महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात पोलिसांनी ११८ (१), ११५(२), ३५२, ३५१(२) कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. सध्या आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories