पिंपरी-चिंचवडमध्येही भोंदूगिरीच्या घटनांचा शोध घ्यावा, विमेन्स हेल्पलाइन फाउंडेशनची पोलिस आयुक्तांकडे मागणी
Mar 23 2026
42
पिंपरी-चिंचवडमध्येही भोंदूगिरीच्या घटनांचा शोध घ्यावा, विमेन्स हेल्पलाइन फाउंडेशनची पोलिस आयुक्तांकडे मागणी
पिंपरी, ता. २३ - महाराष्ट्रात सध्या अशोक खरात भोंदूबाबाने महिलांचे शारीरीक शोषण केल्याने संतापाची लाट उसळली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही अशा प्रकारचे गैरप्रकार सुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, पोलिस दलाने शहरातील गुप्त बातमीदारांमार्फत चौकशी करुन अशात भोंदूगिरीच्या घटना घडत आहेत का याचा शोध घ्यावा व अशा घटना आढळल्यास त्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी विमेन्स हेल्पलाइन फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्षा नीता परदेशी-बैस यांनी पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निता परदेशी यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. या निवेदनात त्यांनी खालील महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
1. पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात भोंदू बाबा, बुवा बाजी, अंधश्रद्धा व चमत्कारांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक किंवा महिलांचे शोषण होत आहे का, याची गुप्त बातमीदारांमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
2. अशा प्रकारच्या गैरकृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
3. नागरिकांना आवाहन करण्यात यावे की, त्यांच्या परिसरात कोणी भोंदू बाबा, बुवा-बाजी, अंधश्रद्धेच्या माध्यमातून महिलांबी किवा सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करत असल्यास त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात किंवा पोलीस हेल्पलाईनवर माहिती द्यावी.
4. माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव व ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्याची हमी पोलीस प्रशासनाने जेणेकरून नागरिक निर्भयपणे पुढे येतील.