news
clock
'गिरिप्रेमी'च्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी ध्वजप्रदान कार्यक्रम

'गिरिप्रेमी'च्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी ध्वजप्रदान कार्यक्रम

'गिरिप्रेमी'च्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी ध्वजप्रदान कार्यक्रम 

'गिरिप्रेमी'च्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी ध्वजप्रदान सोहळा, गिर्यारोहकांना दिल्या शुभेच्छा  

पुणे, ता. २३ - पुण्यातील 'गिरीप्रेमी' या गिर्यारोहण संस्थेच्या वतीने एप्रिल - २०२६ मध्ये आयोजित माऊंट एव्हरेस्ट मोहिमेचा ध्वजप्रदान सोहळा पुण्यात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या प्रसंगी भारताचा तिरंगा, महाराष्ट्राचा भगवा ध्वज आणि गिरिप्रेमीचा ध्वज हे पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते मोहिमेचे नेते ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे आणि त्यांच्या संघाकडे सुपूर्द करण्यात आले.

या वेळी यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे (आय.ए.एस.), गंगोत्री होम्स अँड हॉलिडेजचे संचालक गणेश जाधव यांच्यासह गिरिप्रेमीच्या संस्थापिका अध्यक्षा श्रीमती उषःप्रभा पागे, संस्थापक आनंद पाळंदे व संस्थेचे विद्यमान अध्यक्ष जयंत तुळपुळे उपस्थित होते. 

गिरीप्रेमीचे संचालक उमेश झिरपे म्हणाले, “२०१२ नंतर पुन्हा एकदा गिरिप्रेमीने एव्हरेस्टचा ध्यास घेतला आहे. केवळ गिर्यारोहकांची नव्हे, तर एका सक्षम पिढीची फळी तयार होत आहे. सर्वांच्या पाठिंब्याने आणि आशीर्वादाने ही मोहीम निश्चित यशस्वी होईल.” 

महापौर  नागपुरे म्हणाल्या, “या मोहिमेचा पुणेकर म्हणून आम्हाला अभिमान आहे. एवरेस्ट मोहिम सर्व गिर्यारोहक यशस्वीपणे पूर्णत्वास नेतील याची खात्री आहे. एवरेस्ट सर करुन तुम्ही सुखरुप पुण्यात परत या तोच आपल्या सर्वांसाठी खरा विजय असेल.”

गिरिप्रेमीची ही महत्त्वाकांक्षी एव्हरेस्ट मोहिम तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार विजेते उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार असून चढाई संघात गिर्यारोहक विवेक शिवदे, निकुंज शहा, अखिल काटकर आणि मिहिर जाधव यांचा समावेश आहे.  ही मोहीम भारत सरकारच्या “फिट इंडिया” अभियानाला बळ देणारी असून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक सक्षमता आणि सक्रिय जीवनशैलीचा संदेश देणार आहे. तसेच हिमनद्यांचे संवर्धन आणि हवामान बदलाबाबत जनजागृती हा या मोहिमेचा महत्त्वाचा भाग असणार आहे. काठमांडू, बेस कॅम्पकडे जाणारा मार्ग आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प येथे या विषयांवरील विशेष प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories