चप्पल-बूटांवर 'PUMA' कंपनीचा बनावट लोगो लावून विक्री, व्यावसायिकाला अट

चप्पल-बूटांवर 'PUMA' कंपनीचा बनावट लोगो लावून विक्री, व्यावसायिकाला अट

चप्पल-बूटांवर 'PUMA' कंपनीचा बनावट लोगो लावून विक्री, व्यावसायिकाला अट

पिंपरी, ता. २५ - 'PUMA' कंपनीचा बनावट लोगो लावून चप्पल-बूटांची विक्री केल्याप्रकरणी काळेवाडी येथील व्यावसायिकावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याकडून सुमारे सुमारे ८ लाख ३० हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. त्याला अटक केली आहे. 

याबाबत नीरजकुमार नरेंद्रसिंग दहीया (वय ३८, रा. गाझियाबाद, उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २३) सायंकाळी सुमारे ६.२७ वाजण्याच्या सुमारास काळेवाडी येथील विकी फुटवेअर दुकानात छापा टाकण्यात आला. हे दुकान लकी बेकरी शेजारी आहे. या कारवाईदरम्यान आरोपी विकास उर्फ विकी विनोदकुमार रामनानी (वय ३०, रा. विजयनगर, काळेवाडी) याने प्रसिद्ध ‘पुमा’ कंपनीचे बनावट लोगो लावलेले फ्लिप-फ्लॉप, शूज व चप्पल विक्रीसाठी ठेवले होते. हा माल एकूण ८ लाख ३० हजार २५० रुपयांचा आहे. 

ग्राहकांची व कंपनीची फसवणूक केल्या प्रकरणी आरोपी रामनानी  याला अटक करण्यात आली आहे. 

त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३४७, ३४९ तसेच कॉपीराइट कायद्याच्या कलम ६३ व ६५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories