news
clock
अमेरिकेच्या कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून इसमाची ५ लाखांची फसवणूक

अमेरिकेच्या कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून इसमाची ५ लाखांची फसवणूक

अमेरिकेच्या कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून इसमाची ५ लाखांची फसवणूक 

पिंपरी, ता. २५ - अमेरिकेतील कंपनीत  सिनीयर डायरेक्टर पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून हिंजवडी येथील ४५ वर्षीय पुरुषाची तब्बल ५ लाख ४४० रुपयांची फसवणूक झाली आहे. ३ ते २० मार्च २०२६ या कालावधीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी मंगळवारी (ता. २४) हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फसवणूक झालेल्या पुरुषाने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीस ‘अमित सिंग’ नावाच्या इसमाने मोबाईल व व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून अमेरिकेतील पेपाल कंपनीत सीनियर डायरेक्टर पदाची नोकरी देण्याचे आमिष दाखवले.

यानंतर आरोपीने विविध कारणे सांगत, विशेषतः बँक खात्यांचे केवायसी पूर्ण झाले नसल्याचे सांगून, वेळोवेळी पैसे भरण्यास भाग पाडले. आरोपीच्या सांगण्यावरुन फिर्यादीने स्टेट बँक मॉरिशसच्या  खातेधारकाच्या खात्यावर एकूण ५,००,४४० रुपये जमा केले.

मात्र, एवढी रक्कम घेतल्यानंतर आरोपीने नोकरी दिली नाही तसेच पैसे परत देण्यास टाळाटाळ केली आणि फिर्यादीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.  या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारित) २००८ चे कलम ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरु आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories