कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे कुटुंबीय गजाआड, आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी

कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे कुटुंबीय गजाआड, आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी

कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे कुटुंबीय गजाआड, आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी

पिंपरी, ता.‌ 20 - शेअर मार्केटमध्ये जास्त परताव्याचे व भिशीमध्ये रक्कम गुंतविण्याचे आमिष दाखवून रक्कम ५ कोटी ३ लाख १४ हजार ३६८ रुपयांची फसवणूक करणाऱ्या रमेश पुंजा आहेरकर,  छाया रमेश आहेरकर, वेदांत रमेश आहेरकर व आदित्य रमेश आहेरकर कुटुंबीयांना पोलिसांनी गजाआड केले आहे. ही कामगिरी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली आहे.

याबाबत हनुमंत भागवत जाधव यांनी पोलिसात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत फायनान्स सर्व्हिसेस, त्रिवेणी पुजा भांडार, आदित्य इंटरप्रायझेस अशा फर्म स्थापन करुन रमेश पुंजा आहेरकर छाया रमेश आहेरकर वेदांत रमेश आहेरकर व आदित्य रमेश आहेरकर (रा. शुभारंभ रेसिडेन्सी, फ्लॅट नं ३०२, दत्त मंदिराजवळ, माण, ता. मुळशी)  यांनी आपआपसात संगनमत करुन फिर्यादी व इतर गुंतवणुकदारांना ४ ते ५ टक्के प्रति महिना जादा परताव्याचे आमिष दाखवून रक्कमा शेअर मार्केट मध्ये व भिशी मध्ये गुंतवण्यास भाग पाडले.

फिर्यादी व इतर गुंतवणुकदारांना कोणताही परतावा न देता विश्वासघात करुन रक्कम रुपये ४,१८,२०,८९०/- ची आर्थिक फसवणुक केली.  आरोपीनीं हिंजवडी येथील राहते घर बंद करुन स्वतःचे अस्तित्व लपवून राहत होते. 

सदर आरोपींविरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम 992, 39xi(2), 39 < (8), 3(4) सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ अन्वये गुन्हा नोंद केला.

आरोपींचा शोध घेत असताना कौशल्यपुर्ण तपास करुन तांत्रिक व गोपनीय माहीतीच्या आधारे चारही आरोपींना ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथून अटक करण्यात आले आहे. हे आरोपी 22 जून 2026 पर्यंत पोलिस रिमांडमध्ये असून तपास सुरू आहे.

तपासादरम्यान आरोपींची वेदांत फायनान्सियल सर्व्हिसेस व आदित्य इंटरप्रायझेस या फर्मची व इतर वैयक्तिक अशी एकूण ११ बँक खाती डेबिट फ्रीज करण्यात आलेली आहेत.

ही उल्लेखनिय कामगिरी‌ पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे,  पोलिस सहआयुक्त शशीकांत महावरकर,  अपर पोलिस आयुक्त डॉ. बसवराज तेली, पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे, पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ, तपास अधिकारी सचिन शिर्के, सहायक पोलिस निरीक्षक युवराज कलकुटगे , पो.कॉ.१९६३ सिध्देश्वर सोनटक्के, पो. कॉ. ३५४४ आकाश पारधी व मपोकों. २२५८ प्रिया वसावे आर्थिक गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी केली आहे.

सदर प्रकरणी पोलिसांनी जाहीर आवाहन केले आहे की, पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत वेदांत फायनान्स सर्व्हिसेस, त्रिवेणी पूजा भांडार, आदित्य इंटरप्रायझेस अशा फर्ममार्फत फसवणूक झाली असल्यास 'आर्थिक गुन्हे शाखा पिंपरी-चिंचवड' येथे संपर्क साधावा. 

 पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सर्व नागरीकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी नेहमी शेअरमार्केट मध्ये कमी कालावधीत प्रचंड नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, अल्प कालावधीत दुप्पट-तिप्पट परतावा देण्याचे आश्वासन देणाऱ्या योजना तसेच अनधिकृत मिशीमध्ये गुंतवणुक योजनामध्ये नागरिकांनी गुंतवणुक करु नये.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories