news
clock

ग्लोबल बिझनेस स्कूल अँड रिसर्च सेंटर येथे नुकतीच पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात

पिंपरी, ता. १० - डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या आधिपत्याखालील ग्लोबल बिझनेस स्कूल अँड रिसर्च सेंटर येथे नुकतीच पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. 'डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अॅड ग्रीन ग्रोथ या समकालीन विषयावर आधारित या परिषदेने देशविदेशांतील शिक्षणतज्ज्ञ, उद्योगक्षेत्रातील मान्यवर, धोरणकर्ते व संशोधकांना एकाच व्यासपीठावर आणले. 

दोनदिवसीय परिषदेतील चर्चासत्रांमध्ये नवोन्मेष, शाश्वत विकास आणि सुशासन, या विषयांवर सखोल विचारमंथन झाले. डिजिटल परिवर्तन आणि हरित वाढ यांच्या माध्यमातून सशक्त, समावेशक व शाश्वत जागतिक अर्थव्यवस्था कशी उभारता येईल, यावर विविध देशांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

ही परिषद कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्रकुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, सचिव व प्रकुलगुरू डॉ. स्मिता जाधव आणि कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. उ‌द्घाटनप्रसंगी कुलगुरु डॉ. पवार व डॉ. स्मिता जाधव यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories