गांजा बाळगणाऱ्या युवकाला अशोकनगर-पिंपरी येथून अटक
पिंपरी, ता. ७ - अशोकनगर-पिंपरी येथून २५ वर्षीय युवकाकडून २८ हजार रुपयांचा गांजा बुधवारी (ता. ७) अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला. गांजा बाळगणाऱ्या युवकाला अटक केली आहे.
याबाबत, अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस शिपाई संतोष सपकाळ यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक उत्तम कांबळे (वय २५ वर्षे, रा. बौध्दनगर, पिंपरी) याने २८ हजार रुपयांचा गांजा बाळगला होता. अशोकनगर-पिंपरी परिसरात तो मोकळ्या जागेत रस्त्याकडेला सापडले. त्याच्याकडून १०,००० रुपयांचा मोबाईल, रुपये ९,९०० रोख रक्कम असा एकूण ४८,५००/- चा माल जप्त केला आहे. मिळालेला गांजा कोणाकडून आणला याबाबत आरोपीला चौकशी केली असता त्याने हा गांजा आरोपी गिता मलकेकर (रा. भाटनगर, पिंपरी) हिच्याकडून विक्रीकरीता आणल्याचे सांगितले.
दोन्ही आरोपींवर बुधवारी (ता. ६) पिंपरी पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (त्) (अ), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवकाला अटक केली आहे.