news
clock
राहिलेले पैसे मागितल्याने तरुणाला लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण, कुदळवाडी-चिखलीतील घटना

राहिलेले पैसे मागितल्याने तरुणाला लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण, कुदळवाडी-चिखलीतील घटना

 राहिलेले पैसे मागितल्याने तरुणाला लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण, कुदळवाडी-चिखलीतील घटना 

पिंपरी, ता. ७ - आर्थिक व्यवहारातील राहिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला चार जणांनी लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना कुदळवाडी-चिखली येथे मंगळवारी (ता. ५) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी चौघांवर बुधवारी (ता. ६) चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मारहाणीत जखमी झालेला तरुण आफताब आलम अब्दुल मन्नान शेख (वय २८ वर्षे, व्यवसाय, रा. कुदळवाडी, चिखली) याने तक्रार दिली. फिर्यादी आफताब त्यांच्या व्यवहाराचे राहिलेले पैसे मागण्यासाठी आरोपी मुस्ताक चौधरी यांच्याकडे गेले असता त्याने आफताबला शिवीगाळ केली. यावरुन दोघांमध्ये भांडण सुरु झाले. त्यावेळी आरोपी इरशाद चौधरी, मुमताज चौधरी आणि फिरोज चौधरी आफताबला हाताने आणि लाथाबुक्कांनी मारहाण केली. लोखंडी रॉडने आफताबच्या डोक्यात घालून त्याला जखमी केले. आरोपी हे कुदळवाडीतील रहिवासी आहेत. हा प्रकार कुदळवाडीतील  रविरंजन वजन काट्यापाठीमागील दुकानात घडला आहे. 

 पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कलम ११८(१), ११५(२), ३५५, ३(५) तसेच मपोका कायदा कलम ३७(१)(३) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे व त्यांना नोटिस बजावली आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories