news
clock
संतांची श्रेष्ठ परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात पुढारी भोंदूबाबाचे पाय धुतात, हे निंदनीय - डॉ. श्रीपाल सबनीस

संतांची श्रेष्ठ परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात पुढारी भोंदूबाबाचे पाय धुतात, हे निंदनीय - डॉ. श्रीपाल सबनीस

संतांची श्रेष्ठ परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात पुढारी भोंदूबाबाचे पाय धुतात, हे निंदनीय - डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे, ता. २३ - ''महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास, संत एकनाथ, संत गाडगेबाबा यांच्यासारखे संत होऊन गेले. इथे, अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ उभी राहिली. याच महाराष्ट्रातील राजकीय पुढारी  भोंदूबाबाचे पाय धुतात, हे लाजिरवाणे, किळसवाणे आणि निंदनीय आहे," असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

सामाजिक कार्यकर्ते मनोहर कोलते मैत्र संघ, पुणे यांच्या वतीने शनिवारी (ता. २१) अभिनेते दादा कोंडके यांच्या २८ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित दादा कोंडके समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात पार पडला. त्यावेळी त ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार जयराम देसाई, भारुडकार लक्ष्मण राजगुरू, लघुशिल्पकार हेमंत चिंचवले आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ संजय तासकर पांना दादा कोंडके समाजरत्न पुरस्कार डॉ. सबनीस यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला. गायिका राजश्री कदम-सावंत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 

 ''महिलांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या आयोगाच्या पदावर असलेली व्यक्तीच महिलांचे शेषण करणाऱ्या खरातच्या घाणेरड्या वृतीला पाठीशी घालत असेल, तर हा कसला बुद्धिवादी महाराष्ट्र म्हणावा ?'' अशी टिका डॉ. सबनीस यांनी केली.  

मनोहर कोलते यांनी पुरस्कारामागील भूमिका विशद केली. यावेळी, सामाजिक बांधीलकी जोपासत महावितरणच्या ग्राहकमंचाचे अध्यक्ष महेंद्र दिवाकर यांनी स्नेहछाया बालकाश्रम व नवरत्न वृद्धाश्रमाला प्रत्येकी रुपये 5000/- देणगी दिली. महावितरण मंडई शाखेतील तंत्रज्ञ हरीश बोळे यांनी नवरत्न वृद्धाश्रमास 100 डायपर दिले. शैलेंद्र भालेराव, पराग शिळीमकर व अमर राजपूत यांनी संयोजन केले.  

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories