हडपसरमध्ये  आधुनिक प्रशिक्षण संकुल,  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

हडपसरमध्ये आधुनिक प्रशिक्षण संकुल, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

हडपसरमध्ये  आधुनिक प्रशिक्षण संकुल,  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

पुणे, ता. १६ - महिला व बालविकास विभागाच्या हडपसर येथील जागेवर महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्थेसाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘यशदा’ पुणेच्या धर्तीवर आधुनिक प्रशिक्षण संकुल उभारण्याच्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, संस्थेसाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. या संस्थेमार्फत महिला व बालविकास विभागासह इतर विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत, प्रशासकीय तसेच तांत्रिक प्रशिक्षण देणे शक्य होणार आहे. तसेच मुख्यसेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पायाभूत, प्रेरक व उजळणी प्रशिक्षण अधिक प्रभावीपणे देता येईल.

बैठकीस आयुक्त डॉ. जगदिश मिनियार, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories