महापालिका सर्वसाधारण सभेत नागरिक व लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
Jun 16 2026
19
महापालिका सर्वसाधारण सभेत नागरिक व लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
पिंपरी, ता. १६ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सोमवारी (ता. १५) झालेल्या सर्वसाधारण सभेत नागरिकहित, सामाजिक बांधिलकी आणि लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत, असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले आहे. फेसबुक पोस्टद्वारेही महापौरांनी ही माहिती दिली आहे.
महत्त्वपूर्ण निर्देश पुढीलप्रमाणे -
1. एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध जलसाठ्याचा काटेकोर व नियोजनबद्ध वापर करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आवश्यकतेनुसार कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
2. शहराच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सर्व सन्माननीय नगरसेवकांचा ‘धन्वंतरी स्वास्थ्य योजना’मध्ये समावेश करून त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला निर्देश देण्यात आले.
- Dhanvantari Health Scheme, Medical Facilities,
- Public Welfare, Mayor Ravi Landge, Water Management
- PCMC, Pimpri Chinchwad Municipal Corporation, General Body Meeting, Civic Decisions
- पाणी व्यवस्थापन, मान्सून नियोजन, एल निनो प्रभाव, जलसाठा वापर
- महापालिका सर्वसाधारण सभा, नागरिकहित निर्णय, लोकप्रतिनिधी निर्णय, महापौर रवी लांडगे
- नागरिक व लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वपूर्ण निर्णय