गेल्या १३ वर्षापासून कोमात असलेल्या हरिश राणाचे मंगळवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात इच्छामरण
Mar 24 2026
74
गेल्या १३ वर्षापासून कोमात असलेल्या हरिश राणाचे मंगळवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात इच्छामरण
पुणे, ता. २४ - गेल्या १३ वर्षापासून कोमात असलेल्या हरिश राणा याच्या इच्छामरणाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. दिनांक १४ मार्चपासून हरिशला दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या आयआरसीएचच्या पॅलेटिव्ह केअर वॉर्डमध्ये दाखल केले होते. मंगळवारी (ता. २४) रुग्णालयात निधन झाले. पीटीआयने हरिशच्या निधनाची बातमी दिली आहे.
सन २०१३ मध्ये हरिश राणा पंजाबमध्ये बीटेकचं शिक्षण घेत होता. त्यावेळी चंडिगढमध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून कोसळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून हरिश कोमात होता. १३ वर्षे कोमात असल्याने हरिश राणाच्या आई-वडिलांनी त्याला इच्छामरण मिळावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात मागणी केली होती.
११ मार्च २०२६ रोजी हरिश राणाच्या इच्छामरणाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी देत ऐतिहासिक निर्णय दिला. १४ मार्चपासून हरिशला दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या आयआरसीएचच्या पॅलेटिव्ह केअर वॉर्डमध्ये दाखल केले होते. हरिश राणाच्या इच्छामरणाची प्रक्रिया एम्समध्ये डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली पार पडली. त्याची लाइफ सपोर्ट सिस्टिम हटवल्यानंतर जेवण आणि पाणी हळू हळू बंद करण्यात आले. मंगळवारी (ता. २४) हरिशचे निधन झाले, रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ही माहिती जाहीर केली.