भीमनगर-चिंचवडमध्ये जुन्याभीमनगर-चिंचवडमध्ये जुन्या भांडणाच्या रागातून युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, दोघे अटक
भीमनगर-चिंचवडमध्ये जुन्या भांडणाच्या रागातून युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, दोघे अटक
पिंपरी, ता. २३ - जुन्या भांडणाच्या रागातून युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना चिंचवड परिसरातील भीमनगर-चिंचवड येथील चेतना बारजवळ २२ जून रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजता घडली. या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे, तर एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
या हल्ल्यात ओमकार ऊर्फ हेमंत आनंद ओव्हाळ हा युवक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत, गणेश रघुनाथ जगताप (वय ४४, रा. भिमनगर, चिंचवड) यांनी तक्रार दिली आहे. मारहाणीच्या या प्रकरणातील आरोपी महेश ऊर्फ भैय्या विलास इंगवले (वय २१, रा. भिमनगर, चिंचवड) आणि ईशान अयाज शेख (वय २१, रा. चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन गुन्हेगाराला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
जखमी ओमकार हा फिर्यादी जगताप यांचा भाचा आहे. आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून ओमकारला शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपींनी कोयत्याने त्याच्या डोक्यात, पोटावर, हातावर आणि पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी “आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादी लागला तर अशीच अवस्था करू” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली.
या प्रकरणी आरोपींवर चिंचवड पोलिस ठाण्यात भारतीयन्याय संहिता कलम १०९, ११५ (२), ३५२, ३ (५) भारतीय हत्यार कायदा कलम ४(२७), क्रिमीनल अॅमेंडमेंट ३,७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.