हिंजवडी फेज ३ मध्ये दुचाकी अपघातात दोन युवकांचा मृत्यू

हिंजवडी फेज ३ मध्ये दुचाकी अपघातात दोन युवकांचा मृत्यू

हिंजवडी फेज ३ मध्ये दुचाकी अपघातात दोन युवकांचा मृत्यू

पिंपरी, ता. २२ - भरधाव वेगाने, बेदरकारपणे दुचाकी चालवत सिमेंटच्या कठड्याला धडक दिल्याने दुचाकीस्वार व मागे बसलेल्या मित्राचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी (ता. २१) रात्री २.११ च्या सुमारास हिंजवडी फेज ३ परिसरात घडला आहे. 

या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई  हंसराज राजेंद्र गोरे (नेमणूक हिंजवडी पोलीस ठाणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. 

हा अपघात दि. २१ जून  डीएलएफ सर्कलजवळील मेट्रो स्टेशन परिसरात, हिंजवडी फेज - ३ परिसरात घडला. आरोपी ऋषीकेश सहदेव पोटदुखे (वय २६, रा. कासार एक्सप्रिया सोसायटी, वाकड; मूळ रा. अमरावती) याचा या अपघातात मृत्यू झाला असून त्याचा मित्र अक्षय राजेंद्र कावरे (वय २३) याचाही मृत्यू झाला आहे.

 ऋषिकेश हा दुचाकी भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत होता.‌ रस्त्याच्या परिस्थितीकडे त्याने  दुर्लक्ष केले. त्यामुळे, त्याची दुचाकी सिमेंटच्या कठड्याला धडकली. ऋषिकेश स्वतः  आणि मागे बसलेला त्याचा मित्र अक्षय कावरे दोघेही गंभीर जखमी झाले होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. 

या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६ (१), ३२४ (४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories