कामगारांची फसवणूक करणाऱ्या हिंजवडीतील कंपनीच्या 'सीईओ'ला अटक

कामगारांची फसवणूक करणाऱ्या हिंजवडीतील कंपनीच्या 'सीईओ'ला अटक

कामगारांची फसवणूक करणाऱ्या हिंजवडीतील कंपनीच्या 'सीईओ'ला अटक

पिंपरी, ता. ३ -  कंपनीतील काही कामगारांकडून पैसे घेऊन तसेच काम करुन घेऊन त्यांना पगार बुडवून त्यांची ११ लाख २५ हजार रुपयांची फसवूणक करणाऱ्या कंपनीचा सीईओ हर्षल ठाकरे याला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. 

या फसवणूकीबाबत, सौरव राजन नायर (वय २५ वर्षे, शिक्षण, रा. देहुरोड) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार, आरोपी असलेले कंपनीचे सीईओ हर्षल भानुदास ठाकरे, ट्रेनिंग अँण्ड डेव्हलपमेंट हेड ध्रुविल पारेख, एच आर सौम्या सिंग व थिंक टेक टेक्नॉलॉजी प्रा.लि. सदर कंपनीतील इतर संबधितांवर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

आरोपींनी आपआपसात संगनमत करुन फिर्यादी  सौरव नायर व साक्षीदारांकडून  कंपनीच्या खात्यावर पैसे घेऊन त्यांना ट्रेनिंग दिले. त्यांच्याकडून काम करुन घेऊन लगेच वेगवेगळी कारणे देऊन त्यांचा विश्वासघात करुन त्यांना २ महिन्यांचा पगार दिला नाही. प्रत्येकाकडून प्रत्येकी १५,००० रुपये व कामगारांनी २ महिने केलेल्या कामाचा पगार असे एकूण ११,२५,०००/- रुपये न देता ती रक्कम स्वतःसाठी वापरुन आरोपींनी कामगारांची फसवणूक केली होती. आरोपींवर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

मात्र, गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. प्रकरण माध्यमांमध्ये गाजल्यानंतरच पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाल्याचे बोलले जात आहे.पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात केवळ 11 लाख 25 हजार रुपयांच्या फसवणुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्यक्षात 700 कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेले डिपॉझिट आणि अनेक महिन्यांचे थकीत वेतन विचारात घेतल्यास फसवणुकीची रक्कम कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आरोपीला अटक झाल्यानंतर आता या प्रकरणातील संपूर्ण आर्थिक व्यवहार, कंपनीचे बँक खाते, डिपॉझिटची रक्कम आणि थकीत वेतनाचा मागोवा घेऊन निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories