पिंपळे सौदागरमध्ये क्रिकेट सामन्यावर बेटिंग, तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ३ - पिंपळे सौदागर परिसरात आयसीसी टी-२० क्रिकेट विश्वचषकातील भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यावर बेकायदेशीर बेटिंग केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे सौदागर परिसरात हा बेटिंगचा प्रकार घडला आहे.
आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम ४ व ५ तसेच इंडियन टेलिग्राफ अॅक्ट कलम २५ (क) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जयकुमार सुरेश धनवानी (वय ३६, रा. पिंपळे सौदागर), साहिल सुरेंद्र मंगवानी (वय २५, रा. साई चौक रोड, पिंपरी), विकी जामनदास लोहाना (वय ३४, रा. साई चौक रोड, पिंपरी) यांच्यासह विकी लालवाणी, जितू माकीजा आणि निलेश रामरख्यानी हे सहा बेटिंगच्या प्रकारातील आरोपी आहेत.
आरोपी जयकुमार सुरेश धनवानी, साहिल सुरेंद्र मंगवानी, विकी जामनदास लोहाना यांनी बेकायदेशीररित्या आयसीसी टी-२० क्रिकेट विश्वचषक भारत विरूध्द वेस्टइंडिज या क्रिकेट सामन्यावर मोबाईल कॉलद्वारे विकी लालवाणी, जितू माकीजा, निलेश रामरख्यानी यांची बोली स्विकारून, बेटींग घेत असताना एकूण ६ लाख ५७ हजार ८५०/- रुपयांचे एकूण ७ मोबाईल फोन, रोख रक्कम, वही व १ पेन असे साहित्य मिळाले.