अवैध मद्य वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहिम
पुणे, ता. १५ - परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहिम राबवून मोठी कारवाई केली आहे. भिवंडी येथील मुंबई-नाशिक हायवेवरील वडपे गावच्या कमानीसमोर सापळा रचून तब्बल १ कोटी ९० लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्याचा साठा आणि एक ६ चाकी कंटेनर ट्रक समाविष्ट आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, गोवा राज्यातून बेकायदेशीररित्या विदेशी मद्याची वाहतूक केली जात होती. त्यानुसार भिवंडी विभाग ठाणे-२ च्या पथकाने वडपे गावाजवळ पाळत ठेवून संशयित अशोक लेलँड ६ चाकी कंटेनर (क्रमांक HR-61 F-1508) थांबवला. वाहनाची झडती घेतली असता, त्यात गोव्यातील नामांकित मद्याच्या तब्बल ७७,७६० सीलबंद बाटल्या (१,६२० बॉक्स) आढळून आल्या. याबाबत हनुमान मोबता राम (वय २८ वर्षे, रा. पिरु का तला, सेदवा, बाडमेर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या परिसरात अशा प्रकारे अवैध व बेकायदेशीर मद्याची निर्मिती किंवा वाहतूक होत असल्यास तात्काळ टोल फ्री १८००२३३९९९९ वर अथवा लँडलाईन क्रमांक ०२२-२०८२२४८८ वर संपर्क साधून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल.
- मुंबई नाशिक हायवे कारवाई, Mumbai Nashik highway raid, भिवंडी वडपे कारवाई, Bhiwandi Vadpe operation, कंटेनर ट्रक जप्त, container truck seizure
- १ कोटी ९० लाख मुद्देमाल जप्त, goods worth 1.9 crore seized
- धडक मोहिम कारवाई, special enforcement drive, गोवा विदेशी मद्य जप्ती, Goa foreign liquor seizure
- राज्य उत्पादन शुल्क विभाग, State Excise Department Maharashtra
- अवैध मद्य वाहतूक कारवाई, illegal liquor transportation case,