भायखळा येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण
पिंपरी, ता. १ ऑगस्ट २०२६ - भायखळा येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण शुक्रवारी (ता. ३१) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''साहित्यरत्न लोकशाहीरअण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. चिरागनगर येथे त्यांच्या स्मारक व संशोधन केंद्राच्या उभारणीसह भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण हा त्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे. हे नाट्यगृह अण्णा भाऊ साठे यांचा विचार आणि साहित्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारे केंद्र ठरेल.''
''क्रांतिसूर्य साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपले आयुष्य शोषित, पीडित, दलित, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी समर्पित केले. त्यांच्या साहित्याने आणि शाहिरीने सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली; तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनजागृती करून जनसामान्यांना प्रेरित करण्याचे ऐतिहासिक कार्य केले.'', असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले
यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, बृहन्मुंबईतील लोकप्रतिनिधी, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, महानगरपालिका समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, स्थानिक नगरसेवक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.