पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र टपाल विभागाची मागणी, खासदार श्रीरंग बारणे यांचे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना निवेदन
पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र टपाल विभागाची मागणी, खासदार श्रीरंग बारणे यांचे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना निवेदन
पिंपरी, ता. १ ऑगस्ट २०२६ - पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र टपाल विभाग स्थापन करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवदेनही त्यांना देण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड आज स्वतंत्र प्रशासकीय, औद्योगिक आणि आर्थिक ओळख असलेले वेगाने विकसित होणारे शहर आहे. मात्र, टपाल सेवा अद्यापही पुणे शहर पूर्व टपाल विभागाच्या अखत्यारीत असल्याने अनेक प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना पुण्यात जावे लागते. यामुळे होणारी गैरसोय दूर करून नागरिकांना त्यांच्या शहरातच अधिक सक्षम, तत्पर आणि परिणामकारक टपाल सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी स्वतंत्र टपाल विभाग स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहराला सक्षम, जलद आणि कार्यक्षम टपाल सेवा मिळणे ही काळाची गरज आहे. पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र टपाशहराला सक्षम, जलद आणि कार्यक्षम टपाल सेवा मिळणे ही काळाची गरज आहे.ल विभाग स्थापन झाल्यानंतर शहरातील नागरिकांची प्रशासकीय कामे अधिक सुलभ होतील आणि शहराच्या वाढत्या गरजांनुसार टपाल सेवाही अधिक प्रभावीपणे उपलब्ध होण्यास मदत होईल. या आणि पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे खासदार बारणे यांनी म्हटले आहे.
- नागरिकांची गैरसोय, Public Convenience
- टपाल विभाग, Postal Department, स्वतंत्र पोस्टल डिव्हिजन मागणी, Demand for Separate Postal Division, पिंपरी चिंचवड
- केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे
- खासदार श्रीरंग बारणे, MP Shrirang Barne
- पिंपरी चिंचवड स्वतंत्र टपाल विभाग, Pimpri Chinchwad Separate Postal Division