news
clock
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तिघांची ४३ लाख ८१ हजारांची फसवणूक

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तिघांची ४३ लाख ८१ हजारांची फसवणूक

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तिघांची ४३ लाख ८१ हजारांची फसवणूक

पिंपरी, ता. ४ - सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका इसमाने तीन तरुणांची तब्बल ४३ लाख ८१ हजार ९८५ रुपयांची फसवणूक झाली आहे. सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हा प्रकारअजमेरा-संत तुकारामनगर परिसरात घडला आहे. आरोपीवर शुक्रवारी (ता. ३) संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी जितेंद्र गणपत रसाळ (वय ३८, व्यवसाय – मेडिकल, रा. अजमेरा, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सप्टेंबर २०२४ ते २० ऑक्टोबर २०२५ दरम्यान सेक्टर यू, योगी को-ऑपरेटिव्ह सोसायटी, अजमेरा, पिंपरी येथील फ्लॅटमध्ये घडली.

आरोपी सुरज मदन पाटील (रा. काटी, ता. इंदापूर) याने फिर्यादी जितेंद्र यांना समाजकल्याण विभागात वरिष्ठ निरीक्षक पदावर नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच जितेंद्र यांचा पुतण्या सत्यम दत्तात्रय रसाळ व विक्की राजाराम रेणुसे यांना नागपूर येथील जेल पोलिसांत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले.त्यासाठी तिघांकडून आरोपीने एकूण ४३ लाख ८१ हजार ९८५ रुपये घेतले मात्र, कोणतीही नोकरी न लावली नाही. त्यामुळे तिघांची मोठी फसवणूक झाली आहे. केल्याचे समोर आले आहे.

आरोपीविरोधात संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. पोलिस तपास करत आहेत. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories