news
clock
कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा गळा आवळून खून, निगडीतील घटना

कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा गळा आवळून खून, निगडीतील घटना

कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा गळा आवळून खून, निगडीतील घटना 

पिंपरी, ता. २७ -  कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा ओढणीने आवळून खून केला. ही घटना गुरुवारी (ता. २६) निगडी येथील उरुवेला हाउसिंग सोसायटीत घडली. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. गायत्री राठोड असे मृत महिलेचे नाव आहे.

मृत महिलेचा मुलगा साई मनोज राठोड (वय १६ वर्षे) याने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी, सेक्टर नं. २२, ओटास्कीम परिसरात येथे एका कुटुंबात गुरुवारी (ता. २६) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरुन जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपीने पत्नीला मारहाण करून जमिनीवर पाडले आणि तिच्या गळ्यातील ओढणीने गळा आवळून खून केला. 

माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. आरोपीला पोलिसांनी अया घटनेप्रकरणी अल्पवयीन मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नं. १२९/२०२६ भा.न्या.सं. कलम १०३(१), ११५(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पती आरोपी मनोज बाळूभाई राठोड (वय ४९ वर्षे) याला अटक केली. 

घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धुमाळ करीत आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी विरोधात भारती न्याय संहिता कलम १०३ (१), ११५ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories