कासारवाडी मेट्रो स्टेशनजवळ एसटी बसचा अपघात, बेदरकार एसटी चालकावर गुन्हा दाखल

कासारवाडी मेट्रो स्टेशनजवळ एसटी बसचा अपघात, बेदरकार एसटी चालकावर गुन्हा दाखल

कासारवाडी मेट्रो स्टेशनजवळ एसटी बसचा अपघात, बेदरकार एसटी चालकावर गुन्हा दाखल

पिंपरी, ता. २३ - कासारवाडी मेट्रो स्टेशन परिसरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवाई बसने सोमवारी (ता. २२) काही गाड्यांना धडक दिली.‌ यात काही जण जखमी झाले.  या प्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबत ऋषिकेश उत्तम हंद्राळे (वय २७, रा. धनकवडी, पुणे) यांनी तक्रार दाखल केली. २२ जून २०२६ रोजी दुपारी १२.४० वाजता फिर्यादी व‌ इतर नागरिक पावसामुळे कासारवाडी मेट्रो स्टेशनखाली थांबले असताना  पुण्याकडे जात असताना‌ भरधाव वेगातील शिवाई बस काही गाड्यांना धडकली.

 आरोपी भट्टू अर्जुन आयरे (वय ४३, रा. नाशिक) हा एसटी शिवाई बस (एमएच १२ व्हीटी ११०४) चालवत होता. त्याने बस भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवल्यामुळे हा अपघात घडला.  आणल्याचा आरोप आहे. या अपघातात फिर्यादींसह इतर नागरिकांना दुखापत झाली तसेच वाहनांचेही नुकसान झाले.

या प्रकरणी एसटी बस चालकावर  भारतीय न्याय संहिता कलम १२५(अ), १२५(ब), २८१, ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories