पुणे शहर / जिल्हा
केतन अग्रवाल हत्या प्रकरण - मुख्य आरोपी चेतन चौधरीला लोहगड किल्ल्यावर नेऊन सीन रिक्रिएशन
केतन अग्रवाल हत्या प्रकरण - मुख्य आरोपी चेतन चौधरीला लोहगड किल्ल्यावर नेऊन सीन रिक्रिएशन
पुणे, ता. १ - युवा उद्योजक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात मुख्य आरोपी चेतन चौधरीला पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी (ता. १) लोहगड किल्ल्यावर नेऊन सीन रिक्रिएशन (घटनाक्रमाची पुनर्रचना) करण्यात आले.
केतन अग्रवालला ज्या ठिकाणाहून दरीत ढकलले त्या ठिकाणी चेतन चौधरीला नेले. आरोपीकडून घटनाक्रमाची सविस्तर माहिती घेण्यात आली. या सीन रिक्रिएशनमधून मिळणारे पुरावे आणि आरोपीच्या जबाबाची पडताळणी तपासासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सीन रिक्रिएशननंतर चेतन चौधरीचे गेट अॅनालिसिस करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत आरोपीच्या चालण्याची पद्धत, शरीराची हालचाल आणि घटनास्थळावरील उपलब्ध सीसीटीव्ही किंवा इतर दृश्य पुराव्यांशी त्याची तुलना केली जाणार आहे.